zee marathi gaurav awards has been postponed because of coronavirus gda | Corona Virusचे ग्रहण या पुरस्कार सोहळ्याला, आगामी कार्यक्रमही झाले रद्द

Corona Virusचे ग्रहण या पुरस्कार सोहळ्याला, आगामी कार्यक्रमही झाले रद्द

कोरोना व्हायरसने सर्वत्रच थैमान घातले आहे. कोरोनाने संपूर्ण देशाला धडकी भरवली आहे. जगात झपाट्याने पसरणा-या कोरोनाची दहशत दिवसेंदिवस अधिक वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाला खबरदारी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः गर्दीचे ठिकाणांवर कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्यामुळे थिएटर, मॉल, मंदिरं अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. नुकतेच बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित सिनेमांच्या तारखांसह अपेक्षित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर त्यापाठोपाठ मराठी सिनेसृष्टीवरही याचा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मराठी सिनेसृष्टीवरही कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. झी मराठी गौरव पुरस्कार पुढे ढकलण्यात आले आहेत. नुकतेच या सोहळ्याची नॉमिनेशन पार्टी पार पडली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन दिग्दर्शक आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातील परीक्षक संजय जाधव यांनी केलं होते. त्यानंतर झी मराठी गौरव पुरस्कार सोहळ्याकडे लक्ष लागलं होते. मात्र आता हे पुरस्कार कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे समजतेय. 


तसेच मराठी नाट्यसृष्टीवरही कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. ''अश्रृंची झाली फुले'' या नाटकाचे अमेरिकेतील दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती सुबोध भावेने दिली आहे होती. 


इतकेच नाहीतर सांगलीत होणा-या शंभराव्या नाट्यसंमेलनावर कोरोना इफेक्ट पाहायला मिळतोय. गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना मिळाल्यामुळे नियोजित नाट्यसंमेलनही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना आटोक्यात आला तरच ठरलेल्या काळात हे नाट्यसंमेलन पार पडणार अशी चिन्ह सध्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: zee marathi gaurav awards has been postponed because of coronavirus gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.