'एक गाडी बाकी अनाडी'मधील या अभिनेत्रीचं लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत आहे हे नाते, समजल्यावर व्हाल आश्चर्यचकीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 07:00 AM2021-06-21T07:00:00+5:302021-06-21T07:00:00+5:30

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा 'एक गाडी बाकी अनाडी' चित्रपट १९८८ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

You will be surprised to know that this actress from 'Ek Gaadi Baki Anadi' has a relationship with Laxmikant Berde! | 'एक गाडी बाकी अनाडी'मधील या अभिनेत्रीचं लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत आहे हे नाते, समजल्यावर व्हाल आश्चर्यचकीत!

'एक गाडी बाकी अनाडी'मधील या अभिनेत्रीचं लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत आहे हे नाते, समजल्यावर व्हाल आश्चर्यचकीत!

Next

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी आजही त्यांचे चित्रपट लोक आवडीने पाहतात. असाच त्यांचा एक लोकप्रिय चित्रपट म्हणजे एक गाडी बाकी अनाडी. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री लता अरूण यांचे लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांच्यासोबत खूप जवळचे नाते आहे. या नात्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. 

लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी म्हणजेच अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे लग्नाआधीचे नाव प्रिया अरुण कर्नाटकी. प्रियाचे वडील अरुण कर्नाटकी हे त्यावेळचे प्रसिद्ध निर्माते आणि छायालेखक वासुदेव कर्नाटकी यांचे पुत्र. धोंडी धोंडी पाणी दे, चावट, लपवाछपवी, तिखट मिरची घाटावरची, बंदिवान, पाठलाग या एकामागून एक अशा हिट चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. वेगवेगळ्या विषयावर त्यांनी चित्रपट बनवण्याचे धाडस केले होते आणि हे चित्रपटदेखील सुपरहिट ठरले. पुढे कर्नाटकी यांनी अभिनेत्री लता काळे यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर त्या लता अरुण या नावाने ओळखू लागल्या.


 लता अरुण या मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. १९५८ साली १० लाखाचा धनी या नाटकात पद्मा चव्हाण, शालिनी नाईक यांच्यासोबत त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. तर नटसम्राट हे गाजलेले नाटक त्यांनी रंगभूमीवर पुन्हा नव्याने साकारले. अरुण सरनाईक यांची प्रमुख भूमिका असलेल्या जय रेणुकादेवी यल्लमा चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. चित्रपट आणि नाटक या दोन्ही माध्यमात आपली छाप उमटविली होती. एवढया नामवंत घरात प्रिया बेर्डे यांचा जन्म झाला असला तरी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या कौशल्यावर आपले स्थान निर्माण केले.


लता अरुण आणि प्रिया बेर्डे या दोघी मायलेकी म्हणून फार कमी लोकांना माहित आहे. या दोघींनी एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेदेखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात लता अरूण यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका केली होती तर प्रिया बेर्डे या प्रेयसीच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. 


लता अरुण आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे एकमेकांना खूप आधीपासूनच स्टेज शोमुळे ओळखायचे. १९९० साली लता अरुण जेव्हा खूप आजारी पडल्या त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या घरी जात असत आणि इथेच लक्ष्मीकांत आणि प्रिया यांच्यात प्रेम फुलू लागले. यातच अंथरुणाला खिळून असलेल्या लता अरुण यांचे निधन झाले. यानंतर तब्बल ७ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर १९९७ साली लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण यांनी लग्न केले. त्या दोघांचा संसार सुरू असताना १६ डिसेंबर, २००४ साली निधन झाले. लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांना दोन मुले आहेत अभिनय आणि स्वानंदी. ते दोघेही मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: You will be surprised to know that this actress from 'Ek Gaadi Baki Anadi' has a relationship with Laxmikant Berde!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app