'तू नेहमीच माझ्यासाठी खास राहशील'; प्रार्थना बेहरेने नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 12:31 PM2022-01-17T12:31:30+5:302022-01-17T12:33:52+5:30

प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) हिने इंस्टाग्रामवर नवऱ्यासोबतचा व्हिडीओ शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

'You will always be special to me'; Prarthana Behere wished her husband a happy birthday | 'तू नेहमीच माझ्यासाठी खास राहशील'; प्रार्थना बेहरेने नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

'तू नेहमीच माझ्यासाठी खास राहशील'; प्रार्थना बेहरेने नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Next

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावरील तिची पोस्ट चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसे खास आहे. तिने सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचा व्हिडीओ शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर नवऱ्यासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिचे आणि नवरा म्हणजे अभिषेक जावकरसोबतच खास क्षण शेअर केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करून तिने लिहिले की, माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्यापासून सुरू होते आणि आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्या नावावर संपते; तू नेहमी माझ्यासाठी खास राहशील.... माझं तुझ्यावर प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझा हॅण्डसम नवरा. प्रार्थनाच्या या पोस्टवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे. 


प्रार्थना बेहरे बऱ्याचदा सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. प्रार्थना बेहरेने अभिषेक जावकरसोबत १४ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केले आहे. मूळ 'सिंघम' चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वीच त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची स्वतःची निर्मितीसंस्था सुरु केली. 'डब्बा ऐस पैस', 'शुगर, सॉल्ट आणि प्रेम' या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केली आहे. 'मिसिंग ऑन अ वीकेंड' या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

Web Title: 'You will always be special to me'; Prarthana Behere wished her husband a happy birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app