Ye re ye re paisa sequel released soon | पुन्हा पडणार पैशांचा पाऊस, जाणून घ्या याबद्दल
पुन्हा पडणार पैशांचा पाऊस, जाणून घ्या याबद्दल

'ये रे ये रे पैसा' हा मराठी चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. त्यानंतर या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली होती. या सीक्वलचे दिग्दर्शन हेमंत ढोमे करणार आहे आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर जाहीर केली आहे.

'ये रे येे रे पैसा' चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर केली आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन ऋषीकेश कोळीने केले असून अमेय खोपकर, पर्पल बुल एंटरटेंन्मेन्ट आणि ट्रान्स फॅक्स स्टुडिओज या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अनिकेत विश्वासराव, आनंद इंगळे, मृण्मयी गोडबोले हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


'ये रे ये रे पैसा' चित्रपटाची कथा आहे पाच माणसांची आणि त्यांच्या सोबत घडणाऱ्या गमतीदार गैरसमजाची. उमेश, तेजस्विनी, सिद्धार्थ, संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी म्हणजेच आदित्य, बबली, सनी, अण्णा आणि जान्हवी या पाच जणांच्या आयुष्यात घडणारी एक घटना त्यांना विचित्रप्रकारे एकमेकांसमोर आणते. आपापल्या आयुष्यात या ना त्या कारणाने पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मागे पळत असताना होणाऱ्या भन्नाट गैरसमजांची आणि बनवाबनवीची कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.

Web Title: Ye re ye re paisa sequel released soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.