अभिनेत्री ह्रता दुर्गुळे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. मालिका आणि नाटक विश्वातील तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर ह्रता दुर्गुळे वेगळं स्थान निर्माण केले आहे .ह्रताने तिचे नो मेकअप लूकमधील सेल्फि शेअर केला आहे. या फोटोसोबत ह्रताने क्वारांटाईन लाईफ असा हॅशटॅग दिला आहे. आतापर्यंत या फोटोला 1 लाख 49 हजारहुन अधिक लाईक्स आले आहेत.

छोटा पडदा गाजवल्यानंतर 'अनन्या' सिनेमाद्वारे ऋता या सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.अनन्या हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचे टीजर पोस्टर आऊट झाले आहे. या पोस्टवर अतिशय लक्षवेधी आणि सूचक आहे. मोकळ्या आणि अथांग आकाशाकडे पाहात पक्षाप्रमाणे झेप घेऊ पाहाणारी तरुणी या पोस्टरवर दिसत आहे.


त्यामुळे स्त्री केंद्रित, प्रेरणादायी आणि आशयसंपन्न कथानक या सिनेमातून मांडलं जाणार असल्यानं हा सिनेमा नक्कीच महत्त्वाचा ठरेल यात शंका नाही. लेखक दिग्दर्शक रवी जाधवने या सिनेमाची निर्मिती केली आहे. मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवल्यानंतर अनन्या ही प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Without make up photo of hruta durgule gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.