Will definitely give time for Marathi film - Mansi Salvi | ​मराठी चित्रपटासाठी नक्कीच वेळ देणार - मानसी साळवी

​मराठी चित्रपटासाठी नक्कीच वेळ देणार - मानसी साळवी

मानसी साळवीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच आशीर्वाद, कोई अपना सा, सपने सुहाने लडकपन के, डोली अरमानो की, विरासत, सारथी, सती सत्य की शक्ती, पवित्र रिश्ता, प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा, डोली अरमानो की, इश्कबाज यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकेतील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. तसेच असंभव या मराठी मालिकेतही ती झळकली होती. असंभवमधील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. आता लवकरच एक आस्था ऐसी भी या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून या मालिकेच्या चित्रीकरणाला तिने सुरुवातदेखील केली आहे. या मालिकेत ती नायकाच्या सासूची भूमिका साकारणार आहे. 
मानसी सध्या हिंदी मालिकांमध्येच अधिक झळकत असली तरी तिने आई शपथ्थ, सदरक्षणाय यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. भविष्यातही मराठीत काम करण्याची तिची इच्छा आहे. ती सांगते, "मी गेल्या कित्येक वर्षांपासून डेली सोप करत असल्याने माझ्याकडे मराठी चित्रपटांसाठी वेळ नाहीये. पण एखाद्या चांगल्या मराठी चित्रपटासाठी मला विचारण्यात आले तर मी नक्कीच मराठीत काम करेन. मराठी चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा आहे. संजय जाधव हे माझे खूप चांगले मित्र आहेत. ते मला नेहमीच मस्करीत विचारत असतात की, अम्मा, माझ्या चित्रपटासाठी वेळ देणार का? संजय मला नेहमी अम्मा अशीच हाक मारतात. पण मालिकांमुळे मला नेहमीच त्यांना नकार द्यावा लागतो. पण एखादी चांगली पटकथा असल्यास मला मराठीत नक्कीच काम करायचे आहे." 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Will definitely give time for Marathi film - Mansi Salvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.