अभिनेता अंशुमन विचारेने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अंशुमन विचारे सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तो बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकताच फेसबुकवर अंशुमनने एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून सर्व थक्क झाले आहेत. त्याने कोणत्या तरी महिलेचा फोटो शेअर केला आहे. ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून खुद्द अंशुमन विचारे आहे. स्त्री वेशात त्याला ओळखणेदेखील कठीण झाले आहे.


अंशुमन विचारेने सोशल मीडिया फेसबुकवर स्त्री वेशातील फोटो शेअर करत लिहिले की, वेगळं काही करण्याची मज्जाच गंमत वेगळी असते. अंशुमनच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. खल्लास, छान दिसतो आहेस अशा कमेंट्स फोटोवर येत आहेत. 


या फोटोत अंशुमन विचारे याने गुलाबी रंगाची काठपदराची साडी नेसली आहे. साडीवर नाकात नथ, गळ्यात नेकलेस, आंबडा अशा स्त्री वेशातील गेटअपमध्ये अंशुमन खूप सुंदर दिसतो आहे. 

एकांकिकांमधून घडलेला अंशुमन आज नाटक आणि सिनेमा क्षेत्रात उत्तम स्थिरावला आहे. 'श्वास', 'पोस्टर बॉईज', 'स्वराज्य', 'विठ्ठला शप्पथ' अशा अनेक मराठी सिनेमांंमध्ये अंशुमन विचारेने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मोर्चा या सिनेमाद्वारे त्याने गायनाच्या क्षेत्रात देखील प्रवेश केलेला आहे.

आपल्या विनोदाने सगळ्यांना हसवत ठेवणारा अभिनेता अंशुमन विचारे जेवढा लोकप्रिय आहे, तेवढीच लोकप्रिय त्याची मुलगी सुद्धा आहे. आणि सध्या त्याच्या मुलीचे असे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर रसिकांची प्रचंड पसंती मिळत असते.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Who were you, what happened to you ...! Did you recognize this actor in female costume? Everyone was shocked to see the photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.