कोण आहेत हे समुद्रातील शिवाजी? ज्यांचा थांगपत्ता फक्त समुद्रालाच होता ठाऊक, येणार लवकरच भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 12:49 PM2020-07-08T12:49:25+5:302020-07-08T12:49:46+5:30

माहित आहे का तुम्हाला या ऐतिहासिक महापुरूषाबद्दल, ज्यांचा थांगपत्ता फक्त समुद्रालाच ठाऊक होता. 

Who is Shivaji in the sea? Whose whereabouts were known only to the sea | कोण आहेत हे समुद्रातील शिवाजी? ज्यांचा थांगपत्ता फक्त समुद्रालाच होता ठाऊक, येणार लवकरच भेटीला

कोण आहेत हे समुद्रातील शिवाजी? ज्यांचा थांगपत्ता फक्त समुद्रालाच होता ठाऊक, येणार लवकरच भेटीला

googlenewsNext

ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळताना दिसते. आतापर्यंत बरेच ऐतिहासिकपट प्रदर्शित झाले आहेत. इतिहासाची साथ घेत एका अविस्मरणीय काळाचीच जिवंत अनुभूती देणाऱ्या याच चित्रपटांमध्ये आता आणखी एका पात्राचे आणि अर्थातच आणखी एका ऐतिहासिक घटनेचे नाव जोडले जाणार आहे. कान्होजी आंग्रे यांची शौर्य गाथा आता रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.

भारताचे पहिले नौदल प्रमुख ज्यांचा समुद्रातील शिवाजी म्हणून अखंड मुलखात परिचय होता, ज्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त समुद्रालाच ठाऊक होता असे सरखेल कान्होजी आंग्रे, यांचंच ते नाव. 'कान्होजी आंग्रे' या चित्रपटाच्या निमित्ताने समुद्राच्या लाटा आणि या दर्याच्या भोवती त्याच्याइतकेच गहिरे असणारे राजकारण अचूक हेरून सुरत ते दक्षिण कोकणचा किनारा एकट्याने सुरक्षित ठेवणाऱ्या या वीर समुद्रातील गनिमी काव्याचे जनक अशी ओळख असलेल्या प्रथम नौदल सैनिकाची कामगिरी प्रेक्षकांच्या नजरेस येणार आहे. 

कान्होजी आंग्रे यांची शौर्य गाथा ही प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचावी या उद्देशाने २०२२ मध्ये या चित्रपटाची टीम हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. सुधीर निकम लिखित आणि सुपरव्हायजिंग प्रोड्युसर राहुल भोसले, क्रीएटीव्ह मदारीस प्रस्तुत राहुल जनार्दन जाधव यांच्या 'कान्होजी आंग्रे' या चित्रपटातून कान्होजी आंग्रे यांची ख्याती पाहता येणार आहे.

Web Title: Who is Shivaji in the sea? Whose whereabouts were known only to the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.