What is the secret of Ashwini Bhave's glamorous photomag? | अश्विनी भावे यांच्या ग्लॅमरस फोटोमागचं गुपित काय?

अश्विनी भावे यांच्या ग्लॅमरस फोटोमागचं गुपित काय?

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली.काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतरही अश्विनी भावे स्वतःला सिनेमापासून दूर ठेवू शकल्या नाहीत. आजही त्यांचे सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहेत. काही महिन्यांपूर्वी अश्विनी भावे 'मांजा' या सिनेमात झळकल्या होत्या.सध्या अश्विनी भावे यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.नुकतंच अश्विनी यांनी फोटोशूट केले आहे.या फोटोशूटमधील हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. हाच फोटो सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.या फोटोमधील अश्विनी यांचा ग्लॅमरस अंदाज आजच्या आघाडीच्या नायिकांनाही तोंडात बोटं घालायला लावेल असाच आहे. अश्विनी यांनी या फोटोमध्ये लाल रंगाचा गाऊन परिधान केला आहे.या गाऊनमध्ये त्यांचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.अश्विनी या मुळात सुंदर आहेत आणि त्यांच्या या सौंदर्याला चारचाँद या गाऊनने लावले आहेत असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.ब-याच वर्षांनंतर अनोख्या आणि ग्लॅमरस लूकमध्ये अश्विनी समोर आल्या आहेत.त्यामुळे त्यांच्या या ग्लॅमरस फोटोशूटमागचे नेमके कारण काय याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. विशेषतःत्यांचा हा लूक पाहून आजच्या अभिनेत्रींच्या भुवया उंचावल्या आहेत.या फोटोमागचे कारण काय याबाबतही तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हा स्टनिंग आणि ग्लॅमरस अंदाजातील फोटो म्हणजे अश्विनी यांच्या आगामी सिनेमातील लूक तर नाही ना अशा चर्चासुद्धा रंगल्या आहेत. हा लूक त्यांच्या आगामी नवीन काही प्रोजेक्ट किंवा रिअॅलिटी शो तर नाही ना अशा चर्चाही सुरु झाल्या आहेत.सोशल मीडियावरही या फोटोवर विविध चर्चांसह लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्यामुळे या फोटोचं नेमकं गुपित काय आहे हे जाणून घेण्यासाठी रसिकही उत्सुक झाले आहेत.अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत.आता या ग्लॅमरस फोटोमागचं गुपित काय आहे यावरुन पडदा खुद्द अश्विनी भावे याच हटवू शकतात. त्यामुळे सध्या तरी त्या याबाबत काय सांगणार याची उत्सुकता रसिकांना नक्कीच असेल. 

Also Read:या मराठमोळ्या अभिनेत्रीं लग्न करुन सातासमुद्रापार झाल्या सेटल!
 

Web Title: What is the secret of Ashwini Bhave's glamorous photomag?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.