As well as the friendship of Ashok Saraf and Sachin Pilgaonkar, there is also a special relationship between their children | ​अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांच्या मैत्रीप्रमाणेच त्यांच्या मुलांमध्ये देखील आहे हे खास नाते
​अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांच्या मैत्रीप्रमाणेच त्यांच्या मुलांमध्ये देखील आहे हे खास नाते
अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांची जोडी प्रेक्षकांनी प्रचंड आवडते. सचिन पिळगांवकर हे खूप चांगले अभिनेते असण्यासोबतच ते एक खूप चांगले दिग्दर्शक आहेत. आयत्या घरात घरोबा, अशी ही बनवा बनवी, नवरा मिळे नवरीला अशा अनेक मराठी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. हे सगळेच चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. ऐंशी, नव्वदीचा काळ तर सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांनी अक्षरशः गाजवला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील या दिग्गजांनी प्रेक्षकांचे अनेक वर्षं मनोरंजन केले आणि अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. 
अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांचे खूपच छान ट्युनिंग आहे. प्रेक्षकांना हे ट्युनिंग त्यांच्या सगळ्याच चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांनी चित्रपटांत अनेकवेळा मित्राची भूमिका साकारली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का ते दोघे खऱ्या आय़ुष्यात देखील एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यांनी त्यांच्या मैत्रीचे किस्से अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची खऱ्या आयुष्यात खूप चांगली केमिस्ट्री असल्याने प्रेक्षकांना देखील ही केमिस्ट्री चित्रपटांमध्ये पाहायला मिळत असे.
अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ यांना अनिकेत हा मुलगा असून तो एक प्रसिद्ध शेफ आहे. पाककृतीवरील त्याचे अनेक कार्यक्रम आपल्याला युट्युबला पाहायला मिळतात तर सुप्रिया आणि सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया ही सध्या अभिनयक्षेत्रात आपले भाग्य आजमावतेय. सचिन आणि अशोक सराफ यांच्याप्रमाणे अनिकेत आणि श्रिया यांची देखील खूप चांगली मैत्री आहे. श्रिया सध्या अभी तो पार्टी शुरू हुई है या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान तिने दिलेल्या मुलाखतीत ती सांगते, अनिकेत हा माझा राखी ब्रदर आहे. दरवर्षी मी त्याला राखी बांधते. आमच्या दोघांचे नाते खूपच खास आहे. 

Also Read : ​​या कारणामुळे अशोक सराफ यांना म्हटले जाते अशोक मामा...Web Title: As well as the friendship of Ashok Saraf and Sachin Pilgaonkar, there is also a special relationship between their children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.