In this way, order Bandekar was proposed by Suchitra Bandekar | ​अशाप्रकारे आदेश बांदेकर यांनी प्रपोज केले होते सुचित्रा बांदेकर यांना

​अशाप्रकारे आदेश बांदेकर यांनी प्रपोज केले होते सुचित्रा बांदेकर यांना

होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर लोकांच्या घरातघरात पोहोचले. या मालिकेतील त्यांचे सूत्रसंचालन लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात भावोजी म्हणूनच ओळखले जाते. आदेश चित्रीकरणानिमित्त लोकांच्या घरी गेल्यावर त्यांच्या मधील एक होऊन जातात. मी एक सेलेब्रिटी आहे याचा आव ते कधीच आणत नाही. त्यामुळे त्यांची हीच गोष्ट सर्वसामान्य लोकांना फार आवडते.
होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात तुम्ही अनेकवेळा पाहिले असेल की, जोडप्याचे लव्ह मॅरेज झाले असेल तर आदेश त्यांना तुम्ही कुठे भेटलात, तुमचे कसे जमले हे आवर्जून विचारतात. पण तुम्हाला माहीत आहे का आदेश बांदेकर आणि त्याची पत्नी सुचित्रा बांदेकर यांचे लव्ह मॅरेज झाले आहे आणि त्यांची प्रेमकथा खूपच इंटेरेस्टिंग आहे. सुचित्रा केवळ नववीत असल्यापासून आदेश यांना खूप आवडत होत्या. रथचक्र या मालिकेत सुचित्रा काम काम करत होत्या. या मालिकेच्या एका भागात आदेश यांनी काम केले होते. आदेश सुचित्रा यांना पाहताच क्षणी त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे सुचित्रा यांच्या शाळेच्या इथे आदेश अनेक वेळा जात असे. त्यांना पाहून माझा पाठलाग करू नकोस, मी काही तूला होकार देणार नाही असे सुचित्रा त्यांना बोलली होती. पण आदेश यांनी सुचित्रा यांना दादरच्या एक हॉटेलमध्ये भेटायला बोलवले. सुचित्रा आदेश यांना भेटायला जाण्यासाठी एका मैत्रिणीला सोबत घेऊन निघाल्या. पण त्यांना भीती वाटत असल्याने त्या हॉटेलमध्ये न जाता दादरमध्ये दुसरी कडेच फिरत राहिल्या. आदेश त्यांची अनेक तास वाट पाहत बसले होते. पण त्या काही आल्या नाहीत. त्यामुळे शेवटी ते सुचित्रा यांच्या घरी गेले. पण सुचित्रा घरी पोहोचल्याच नव्हत्या. पण काहीच वेळात त्या घरी आल्या आणि आदेश यांना आपल्या घरात पाहून त्यांना चांगलाच धक्का बसला. आदेश मस्त त्यांच्या आईशी गप्पा मारत होत्या. त्यानंतर सुचित्रा यांच्या आईला बाहेर जायचे होते, म्हणून आदेश आईसोबतच निघाले. पण बस स्टॉपला गेल्यावर मला एक काम आहे असे कारण देत तिथून निघून गेले आणि त्यांनी थेट सुचित्रा यांचे घर गाठले. सुचित्रा यांनी दरवाजा उघडला तर आदेश खूप चिडलेले होते. मला हो तर हो नाही तर नाही सांग मी तुला पुन्हा विचारणार नाही. आज मी तुला महालक्ष्मीला घेऊन जाणार होतो. मी तुला पाच मिनिटे देतो मला उत्तर दे असे आदेश म्हणाले. त्यावर थोड्याच वेळात महालक्ष्मीला कधी जायचे असे सुचित्राने आदेशला विचारले. आदेश यांनी अशा वेगळ्यात अंदाजात सुचित्राच्या घरात त्यांना प्रपोज केले होते.
सुचित्रा आणि आदेश यांच्या नात्याला सुचित्रा यांच्या घरातून खूप विरोध होता. आदेश त्यावेळी इंडस्ट्रीत स्ट्रगल करत होते. पण घरातल्यांच्या विरोधाला न जुमानता सुचित्राने त्यांच्या सोबत लग्न केले. मी क्लासला जाते असे सांगून त्या घरातून निघून गेल्या आणि त्यांनी बांद्रा कोर्टात जाऊन आदेश सोबत लग्न केले. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्यांच्या लग्नाचा खर्च केवळ ५० रुपये आला होता.

Also Read : अभिनेत्री नेहा जोशीला आदेश भाऊजींकडून मिळाले एक खास सरप्राईज

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: In this way, order Bandekar was proposed by Suchitra Bandekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.