मानसीनं आपली फॅशन स्टाईल जपली आहे. तसेच ती बऱ्याचदा तिच्या डान्स व फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मानसी नाईकने बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबतचा नुकताच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

मानसी नाईकने इंस्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते नखरा हे स्वॅग या गाण्यावर एक्ट करताना दिसत आहेत. या व्हिडिओत ते दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहे. या व्हिडिओवर खूप कमेंट्स व लाइक्स येत आहेत.

मानसी नाईकने स्वतःच तिच्या रिलेशनशीपबद्दल सोशल मीडियावर सांगितले होते. तिने प्रेमात असल्याचे सांगून तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला. मानसी नाईक हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्या दोघांचा फोटो शेअर करत लिहिले की, यावर्षी मी स्वतःला गिफ्ट द्यायचे ठरवले तेही प्रेम व कमिटमेंटसोबत. ओळखा काय असेल ते. मेहनती, प्रेमळ व विश्वासू आणि कमिटेड व्यक्ती. हो मी प्रेमात पडली आहे. प्रदीप खरेरा तुझे माझ्या जगात स्वागत आहे.

प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता व मॉडेल आहे. मानसी आणि प्रदीप कधीपासून प्रेमात आहेत आणि ते एकमेकांना कसे भेटले, हे अद्याप समजलेले नाही.


मानसी नाईक हिने प्रेक्षकांना आपल्या नृत्याच्या अदांनी घायाळ केले आहे. 'बघतोय रिक्षावाला' म्हणत तिने मराठी प्रेक्षकांना आपल्या तालावर डोलायला लावले. ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून अभिनेत्री मानसी नाईकच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एक चांगली नृत्यांगना मिळाली आहे.

त्याचबरोबर एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचीदेखील ओळख तिने करून दिली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video: Mansi Naik shares romantic video with boyfriend, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.