हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अभिनेता वैभव तत्ववादी त्याच्या चित्रपट व भूमिकेमुळे चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो.

वैभवने नुकताच एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोतून समजतंय की त्याने त्रिभंगा या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या फोटोत त्याच्यासोबत अभिनेत्री रेणुका शहाणे दिसत आहे. त्याने हा फोटो शेअर करत म्हटले की, शूटिंग संपले. त्रिभंगाच्या संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. पत्र दिल्यामुळे रेणुका मॅम तुमचे आभार. हे मी कधीच विसरणार नाही.


त्रिभंगा या सिनेमाचे दिग्दर्शन रेणुका शहाणे करत असून हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात मुंबईतील एका कुटुंबाची कथा रेखाटण्यात आली आहे. १९८०च्या दशकापासून आतापर्यंत एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांची कथा व त्यांच्या जीवनाशी निगडीत समस्या दाखवले जाणार आहेत.


वैभव मराठी चित्रपट 'पाँडिचेरी'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तो सईसोबत दिसणार आहे. या सिनेमात सई व वैभव तत्त्ववादीसोबत अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी दिसणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.


वैभव तत्ववादीने कॉफी आणि बरंच काही, व्हॉट्सअप लग्न यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर त्याने अधिराज्य गाजवले आहे.
बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका यांसारख्या हिंदी चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. आता वैभव विद्या बालनसोबत काम करणार आहे. प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये वैभव एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Vaibhav Tatwawaadi Completed the Shooting of Tribhanga Hindi Movie ; Check Out Photos and Detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.