आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातून अभिनेत्री तृप्ती तोरडमल हिने फॅन्स आणि समीक्षकाची मनं जिंकली. तृप्ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टीव्ह असते. तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते.


तृप्तीने सोशल मीडियावर हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तृप्ती खूपच हॉट अँड बोल्ड दिसतेय. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी रसिकांनी खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे. तिच्या कॅमे-यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा चाहत्यांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.


तृप्ती फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग आहे. फॅट टू फिट असा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. जीममध्ये तासनतास घाम गाळण्यापेक्षा घरच्या घरी व्यायाम अथवा योगासन करत ते स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. कामाचं दडपण तसंच दगदग यांत स्वतःला फिट ठेवणं हीसुद्धा काळाची गरज आहे. तिचे हे व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की.

Web Title: Trupti toradmal share her hot photoshoot on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.