ठरलं! 'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर या दिवशी बांधणार लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 07:32 PM2022-01-14T19:32:46+5:302022-01-14T19:33:16+5:30

Rohit Raut and Juilee Joglekar : नुकताच अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा प्रतीक शाह सोबत साखरपुडा पार पडला. आता आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकणार आहे.

That's it! 'Saregampa Little Champ' fame Rohit Raut and Juilee Joglekar to tie the knot on this day | ठरलं! 'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर या दिवशी बांधणार लग्नगाठ

ठरलं! 'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर या दिवशी बांधणार लग्नगाठ

Next

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकताच अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा प्रतीक शाह सोबत साखरपुडा पार पडला. आता आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नबेडीत अडकणार आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम रोहित राऊत (Rohit Raut ) लवकरच गायिका जुईली जोगळेकरसोबत ( Juilee Joglekar) विवाह बंधनात अडकणार आहे. नुकतेच त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. त्यानंतर ते कधी लग्नबंधनात अडकणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. 

जुईली जोगळेकर हिने इंस्टाग्रामवर रोहित राऊत सोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले आहे. तिने म्हटले की, चला. दहा दिवस बाकी आहेत. यावरून ते दोघे २३ जानेवारीला लग्नबंधनात अडकू शकतात. 


रोहित व जुईलीच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. या फोटोंवरून रोहित आणि जुईली लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.

सोशल मीडियावर दिली होती प्रेमाची कबुली
२००९ साली झी मराठीवर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा पहिला सीझन आला होता. रोहित राऊत या पहिल्या पवार्चा विजेता ठरला होता. त्यानंतर रोहितने गायक म्हणून सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर ही देखील स्पर्धक म्हणून आली होती. तेव्हापासून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले आणि मग प्रेमात. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली आहे.

Web Title: That's it! 'Saregampa Little Champ' fame Rohit Raut and Juilee Joglekar to tie the knot on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app