Tejaswini Pandit shared a photo with a traditional look | तेजस्विनी पंडित शेअर केला ट्रेडिशनल लूकमधला फोटो, चाहत्यांसह केला कमेंट्सचा वर्षाव

तेजस्विनी पंडित शेअर केला ट्रेडिशनल लूकमधला फोटो, चाहत्यांसह केला कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांना देत असते. तेजस्विनीने ऑरेंज रंगाच्या ड्रेसमधला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  ट्रेडिशनल लूकमध्ये तेजस्विनी खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला आहेे. चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव त्यांनी या फोटोवर केला आहे.   

मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.लवकरच तेजस्विनी 'समातंर 'च्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहे.

तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी ‘अगं बाई अरेच्चा’ या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tejaswini Pandit shared a photo with a traditional look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.