मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी आज आघाडीची अभिनेत्रीच्या यादीत गणली जाते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. .तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. तेजस्विनीने नुकताच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.

या फोटोत ती ट्रेडिशनल लूकमध्ये दिसते आहे. फॅन्सना तेजस्विनीचा हा फोटो तिच्या फॅन्सना ही आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून त्यांनी आपली पसंती दर्शवली आहे.

तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले.


Web Title: Tejaswini pandit share her traditional photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.