ठळक मुद्देस्वप्निल या लूकमध्ये खूपच चांगला दिसतो असे त्याच्या काही चाहत्यांचे म्हणणे आहे तर काहींना त्याचा हा लूक रुचलेला नाही. तू साध्या लूकमध्येच छान दिसतो असे काही जण कमेंटच्या माध्यमातून त्याला सांगत आहेत. 

सध्या सगळेच कलाकार सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांचे विविध फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांच्या फोटोंना, व्हिडिओंना देखील त्यांच्या चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते. अभिनेता स्वप्निल जोशीने देखील त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे.

स्वप्निलने पोस्ट केलेल्या या फोटोत त्याला ओळखणे देखील कठीण जात आहे. त्याच्या या लूकची सध्या त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे. स्वप्निल या लूकमध्ये खूपच चांगला दिसतो असे त्याच्या काही चाहत्यांचे म्हणणे आहे तर काहींना त्याचा हा लूक रुचलेला नाही. तू साध्या लूकमध्येच छान दिसतो असे काही जण कमेंटच्या माध्यमातून त्याला सांगत आहेत. 

स्वप्निलने आपल्या हटके अभिनय शैलीने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच प्रेक्षक त्याला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणून संबोधतात. स्वप्निल जोशीने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले. पुढे त्याने ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘अमानत’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वत्र कौतुक झाले होते. ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमात स्वप्निलचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना बघावयास मिळाला.

आपल्या विविधरंगी भूमिका आणि अनोख्या स्टाईलने स्वप्निलने तरुणाच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरही स्वप्नीलने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'चेकमेट', 'दुनियादारी', 'मुंबई-पुणे-मुंबई', 'मितवा', 'मोगरा फुलला' अशा विविध चित्रपटांमधून स्वप्निलने आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. स्वप्निल सोशल मीडियावरही सक्रीय असतो. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधतो.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Swapnil Joshi western look on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.