स्वानंदी सिनेमात एंट्री करणार असल्याचे ब-याच दिवसांपासून चर्चा आहेत. सिनेमात झळकण्यापूर्वीच तिने रसिकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. सिने इंडस्ट्रीत अभिनेत्रीचा टॅग मिळवण्याआधीच स्वानंदीने रसिकांची पसंती मिळवली आहे. ती  आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. ड्रेसिंग स्टाईल आणि फॅशन कशी असावी हे ती उत्तमरित्या जाणते.  


विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

काही दिवसांपूर्वीच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्वानंदीचाहा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.

Web Title: Swanandi Berde Photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.