आमच्या दोघांच्या आयुष्यात आला तिसरा म्हणत सुव्रत जोशीने दिली गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:36 AM2021-02-26T11:36:32+5:302021-02-26T11:38:57+5:30

सुव्रतने नुकतीच सोशल मीडियावर आमच्या दोघांच्या आयुष्यात तिसरा आला असे म्हणत गुड न्यूज शेअर केली आहे.

suvrat joshi buys car, gives good news on social media | आमच्या दोघांच्या आयुष्यात आला तिसरा म्हणत सुव्रत जोशीने दिली गुड न्यूज

आमच्या दोघांच्या आयुष्यात आला तिसरा म्हणत सुव्रत जोशीने दिली गुड न्यूज

googlenewsNext
ठळक मुद्देसुव्रतने नुकतीच नवीन गाडी घेतली असून त्याविषयी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, आमच्या दोघांमध्ये काल रात्री तिसरा आला. गाडी घ्यावी अशी 1996 पासून माझ्या आईची इच्छा होती. 25 वर्षांनंतर माझ्या आईची ही इच्छा पूर्ण झाली.

सुव्रत जोशी आणि सखी गोखले ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सुव्रतने नुकतीच सोशल मीडियावर आमच्या दोघांच्या आयुष्यात तिसरा आला असे म्हणत गुड न्यूज शेअर केली आहे.

सुव्रतने नुकतीच नवीन गाडी घेतली असून त्याविषयी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, आमच्या दोघांमध्ये काल रात्री तिसरा आला. गाडी घ्यावी अशी 1996 पासून माझ्या आईची इच्छा होती. 25 वर्षांनंतर माझ्या आईची ही इच्छा पूर्ण झाली. कोणत्याही मध्यमवर्गीय मुलाप्रमाणे मला देखील आज खूप चांगले वाटत आहे. अनेक वर्षे गाडी न घेता राहण्याचा प्रयत्न केला. पण पब्लिक ट्रान्सपोर्ट वर अवलंबून राहणे शक्य झाले नाही. पुन्हा विजेवर चालणारी गाडी घेतली तर त्याला पूरक अशा साधन यंत्रणा भारतात अजून तरी उपलब्ध नाहीत. शेवटी मी पेट्रोल वर चालणारी गाडी घेतली. मग माझ्या समाधानासाठी मी एक गोष्ट केली. मी माझ्या गाडीचे energy audit करून घेतले. मी साधारण गाडी किती वापरणार याचा अंदाज बांधून मी किती धूर हवेत सोडणार हे काही तज्ज्ञांकडून समजून घेतले. तो धूर शोषून घ्यायला पुढच्या ५-६ वर्षात साधारण शंभरेक झाडे लावायचा मानस आहे. 

So a third one arrived between us two yesterday. My Aai desired to own a car in 1996,I guess her dream came to reality ...

Posted by Suvrat Laxman Joshi on Thursday, February 25, 2021

काल त्याची सुरुवात म्हणून गाडीचे पेढे वाटण्याआधी काही वृक्ष लावायला म्हणून एक रक्कम प्रदान केली आहे. असेच दर सहा महिन्याला घडावे अशी इच्छा आहे. मग ही झाडे मी गाडी वापरायची थांबवल्यावरही धूर शोषत राहतील. तुम्हाला ही कल्पना आवडली असल्यास मी तर म्हणीन हे नव्या युगाचे ritual म्हणून आपण अध्यरुत करूया. दरवेळी नवीन गाडी घेतली की पुढची काही एक वर्ष आपण झाडे लावायची. आपला धूर आपणच शोषून घ्यायचा. अर्थात हे थोडे तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्हायला हवे म्हणजे त्याचा पुरेपूर फायदा होईल, अन्यथा चुकीची वृक्षलागवड केल्याने तोटाही होऊ शकतो. असो. 
तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आपण फक्त ऐहिक यशावर स्वतःचे मूल्यमापन करू नये पण तरी माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलाला अशा गोष्टी आयुष्यात आल्यावर आनंद होतोच. 

Web Title: suvrat joshi buys car, gives good news on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.