Suchitra And Aadesh Bandekar Wedding Album Goes Viral On Social Media-SRJ | लग्नात असा होता दोघांचा अंदाज ? ३० वर्षापूर्वी अडकले होते लग्नबंधनात, व्हायरल होतोय Wedding Album

लग्नात असा होता दोघांचा अंदाज ? ३० वर्षापूर्वी अडकले होते लग्नबंधनात, व्हायरल होतोय Wedding Album

मराठीतीली सर्वात गोड जोडी म्हणजे महाराष्ट्राचे भावोजी आदेश बांदेकर आणि त्यांच्या होममिनिस्टर सुचित्रा बादेकर. महाराष्ट्राच्या कानकोप-यात आज आंदेश बांदेकर यांचे चाहते आहेत. त्यांच्याबाबती प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात प्रत्येकालाच रस असतो. सोशल मीडियावर आदेश बांदेकर यांचा लग्नाचा जुना फोटो व्हायरल होतोय.  

29 वर्षांपासून हे दोघे सुखी वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहेत. त्यांना सोहम नावाचा एक मुलगा आहे. मुळात या दोघांची लव्हस्टोरी सिनेमाला साजेशी अशीच आहे. लग्नाच्या २९ वर्षानंतरही हे दोघे आजही त्यांच्यात स्ट्राँग बॉन्डींग आहे. 

अनेक चढउतार आलेल्या या दोघांच्या आयुष्यात खंबीरपणे दोघांनी एकमेकांना साथ दिली. या दोघांबद्दलचा एक किस्सा असा आहे की, लग्नानंतर दोघांचा सुखी संसार सूरू झाला. मात्र संसाराचा गाडा हाकण्यासाठी बांदकरांकडे हातात फार पैसा नसायचा. पण तरीही कधीच सुचित्रा यांनी कोणत्या गोष्टीला घेवून नाराजी दाखवली नाही.

नेहमीच जे आहे त्यात  समाधान मानत नेहमी आनंदी राहिल्या. आदेश यांना या काळात सुचित्रांनी खूप साथ दिली. इतकेच काय तर लग्नात घालायला त्यांच्याकडे सोन्याचा एक दागिना नव्हता. आदेश यांनी 500 रुपयांचे बेंटेक्सचे मंगळसूत्र आणले होते. त्यात केवळ एक सोन्याचा मुहूर्तमणी होता. सुचित्रांनी कधीच सोन्यासाठी किंवा कोणत्याही वस्तूसाठी हट्ट धरला नाही. 

 2006 मध्ये 'होम मिनिस्टर' मालिका यशस्वी झाल्याने बांदकरांचेही नशीबाने साथ दिली आणि हातात पैसा आला आणि आदेश यांनी मिळालेल्या कमाईतून  पहिले काम केले ते फक्त त्यांच्या पत्नीसाठी. सुचित्रा यांच्या आवडीचे सोन्याचे मंगळसूत्र त्यांनी त्यावेळी घेतले होते. आजही पाठीवळून बघताना हे कपलकडे असंख्य अशा आठवणींचा साठी आहे. साहजिकच आठवताच डोळ्यात अश्रु तरळत असतीलही. पण त्याच कटु अनुभवांनी आज हे कपल इतरांसाठीही प्रेरणादायी बनले आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Suchitra And Aadesh Bandekar Wedding Album Goes Viral On Social Media-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.