Such a state of Rinku Rajguru due to the film of Sarat ... Even today, there were difficulties to get out of the house | ​सैराट या चित्रपटामुळे रिंकू राजगुरूची झाली अशी अवस्था... आजही घराच्या बाहेर पडणे होते कठीण
​सैराट या चित्रपटामुळे रिंकू राजगुरूची झाली अशी अवस्था... आजही घराच्या बाहेर पडणे होते कठीण
"मराठीत सांगितलेलं कळत न्हाय, इंग्लिशमध्ये सांगू," असं म्हणत तमाम सिनेरसिकांना अक्षरक्षः वेड लावणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु. सैराट सिनेमातील तिच्या अभिनयाने रसिकांवर जादू केली. सैराटमध्ये परशासोबत तिची रोमँटिक केमिस्ट्री, तिचा तितकाच बेधडक अंदाज, बुलेटच नाही तर ट्रॅक्टरही लिलया चालवणं सारं काही रसिकांवर जादू करून गेलं. तिच्या अभिनयाचं कौतुक रसिकांसह समीक्षकांनीही केलं. इतकंच नाही तर तिला अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कासुद्धा प्रदान करण्यात आला. पहिल्याच सैराट या सिनेमामुळे रिंकूने तमाम नायिकांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं. सैराटच्या यशामुळे रातोरात स्टार बनलेल्या या अकलुजच्या कन्येकडे विविध ऑफर्स आल्या. या चित्रपटाच्या कन्नड रिमेक मध्ये देखील प्रेक्षकांना तिला पाहायला मिळाले होते. आता कागर या चित्रपटात प्रेक्षकांना ती दिसणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील तिने सुरुवात केली आहे.
रिंकू राजगुरूचा सैराट हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही वर्षं उलटून गेली असली तरी रिंकूच्या लोकप्रियतेत थोडा देखील फरक पडलेला नाही. तिची एक तरी झलक पाहायला मिळावी असे तिच्या फॅन्सना वाटत असते. रिंकू ही मुळची अकलूजची असली तरी ती सध्या पुण्यात राहात आहे. अकलूजमध्ये आल्यावर रिंकूला संपूर्ण दिवस घरातच काढावा लागतो. रिंकूला फिरायला, मित्रमैत्रिणींसोबत फिरायला खूप आवडते. पण सैराट या चित्रपटानंतर एका सामान्य मुलीसारखे तिला आयुष्य जगता येत नाही. तिला फिरायचे असेल तर चेहऱ्यावर स्कार्फ बांधावा लागतो. त्यातही तिच्या घरात गाड्या किती आहेत आणि त्यांचा नंबर काय आहे हे लोकांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे स्कार्फ बांधण्याचा देखील काहीही फायदा होत नाही. लोक तिचा पाठलाग करतात. यामुळे तिला खूपच त्रास सहन करावा लागतो. 
रिंकू अकलूजमध्ये आली आहे हे कोणाला कळू नये यासाठी चांगलीच खबरदारी घेतली जाते. तिच्या कॉलनीतील लोक खूपच चांगले आहेत. ती अकलूजमध्ये आले आहे हे कोणाला कळू नये यासाठी ते देखील तिला मदत करतात.

Also Read : सैराट फेम रिंकू राजगुरूचे खरे नाव तुम्हाला माहीत आहे का? Web Title: Such a state of Rinku Rajguru due to the film of Sarat ... Even today, there were difficulties to get out of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.