Stunning ..! Spruha Joshi shared photos in black gown, see her photos | Stunning..! ब्लॅक गाऊनमध्ये स्पृहा दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

Stunning..! ब्लॅक गाऊनमध्ये स्पृहा दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 'मोरया', 'पैसा पैसा' यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. काहीच महिन्यांपूर्वी तिचा 'बाबा' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. याशिवाय छोट्या पडद्यावरही मालिकांमधून तिने तिच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. तिचे फोटो तिच्या फॅन्सना प्रचंड आवडतात.

स्पृहा जोशीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोत तिने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तिच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

स्पृहा काही दिवसांपूर्वी आपल्या आगामी हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त होती. रंगबाज ह्या स्पृहाच्या नव्या वेबसीरिजचे चित्रीकरण मध्यप्रदेशमधील भोपाळ आणि चंदेरीमध्ये पार पडले आहे. रंगबाजच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी स्पृहाने सर्वांसाठी मस्त मेजवानीचा घाटदेखील घातला होता.


स्पृहा जोशी सध्या कलर्स मराठीवर सूर नवा ध्यास नवा - स्वप्न सूरांचे, स्वप्न सार्‍यांचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून तिचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना चांगलेच भावत आहे. याआधीच्या सिझनमध्ये देखील तिने सूत्रसंचालकाची भूमिका बजावली होती.

Web Title: Stunning ..! Spruha Joshi shared photos in black gown, see her photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.