शिवाजी महाराजांच्या काळातील या पराक्रमी महापुरूषाची कथा उलगडणार रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 06:49 PM2020-07-31T18:49:51+5:302020-07-31T18:50:24+5:30

शिवाजी महाराजांच्या काळातील या पराक्रमी महापुरूषाची कथा रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.

The story of this mighty great man of Shivaji Maharaj's time will unfold on the silver screen | शिवाजी महाराजांच्या काळातील या पराक्रमी महापुरूषाची कथा उलगडणार रुपेरी पडद्यावर

शिवाजी महाराजांच्या काळातील या पराक्रमी महापुरूषाची कथा उलगडणार रुपेरी पडद्यावर

googlenewsNext

मराठा आरमार हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्रपणे स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यातील आरमारावर आधारित आहे. हिंदवी स्वराज्याच्या सीमा बळकट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र आरमाराची निर्मिती केली. आणि जागतिक स्तरावर स्वपराक्रमाने हिंदवी स्वराज्य गाजू लागले. या मराठा आरमाराची परंपरा समर्थपणे सांभाळणारे आणि वाढवणारे महापुरुष या हिंदवी स्वराज्यात उदयास आले स्वराज्याशी सदैव निष्ठा राखून त्यांनी आपल्या स्वबळावर एकाच वेळी अनेक शत्रूंशी शौर्याने झुंज दिली. अशा पराक्रमी महापुरुषाची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर येणार आहे.

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या जीवन चरित्रावर हा चित्रपट आधारित आहे. याकरिता विशेष मार्गदर्शन सरखेल रघुजीराजे अँग्रे,दामोदर मगदूम Adv. सुरज रेणुसे यांचे लाभले आहे. या चित्रपटाची निर्मिती योगेश जाधव आणि Adv. रंजीत हांडे देशमुख  करतआहेत. चित्रपटाची पटकथा संवाद व दिग्दर्शन गणेश कोळपकर यांचे आहे.सागरावरील चित्तथरारक मराठा आरमाराचा पराक्रम या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मराठी ,हिंदी आणि इंग्रजी मध्ये होणार आहे

Web Title: The story of this mighty great man of Shivaji Maharaj's time will unfold on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.