मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक म्हणजे स्पृहा जोशी. आपल्या अभिनयाने स्पृहानं रसिकांची मनं जिंकली आहेत. विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहानं आपल्या अभिनयाची छाप पाडली. याशिवाय छोट्या पडद्यावरील मालिकांमधून तिने तिच्या अभिनयाची जादू पसरवली आहे. स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. नुकताच स्पृहाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तिने कुछ कुछ होता है चित्रपटातील अंजलीसारखा लूक केला आहे.

स्पृहा जोशीनं इंस्टाग्रामवर तिचा फोटो शेअर करीत लिहिलं की, कुछ कुछ होता है अंजली, तुम नही समजोगी. स्पृहाचा हा युएसएमधील असून सध्या ती तिथे सुट्टी एन्जॉय करते आहे.

या फोटोत स्पृहानं मिकी माऊसचं चित्र असलेलं टीशर्ट आणि ग्रे रंगाची ट्रॅक पॅण्ट घातली आहे. तसेच नुकताच तिने शॉर्ट हेअर केले आहेत. तिने नियॉन ग्रीन रंगाचा हेअरबॅण्ड परिधान केला आहे. ती कॅज्युएल लूकमध्ये दिसते असून तिला पाहताच कुछ कुछ होता हैमधील अंजलीची आठवण होते.


स्पृहा जोशी हिचा नुकताच बाबा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने पल्लवीची भूमिका साकारली होती. या भूमिकेविषयी बोलताना स्पृहा जोशी म्हणाली की ‘मी आणि अभिजीत मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र येत आहोत. आम्ही दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत आहोत. अभिजीत आणि मी चांगले मित्र आहोत, पण आम्ही याआधी कधीच एकत्र काम केले नव्हते. ‘बाबा’च्या माध्यमातून ती संधी चालून आली, याचा मला आनंद आहे. ‘बाबा’ ही नात्यांमधील बंधाची एक सुरेख कथा आहे. आम्हा दोघांमधील केमिस्ट्रीचा प्रश्नच उद्भवला नाही, कारण आम्ही एकमेकांना खूपच चांगले ओळखतो’.

Web Title: Spruha Joshi look a like Anjali of Kuch Kuch Hota Hai, she is in USA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.