कोरोना व्हायरसच्या संकटामुळे बरीच महिने सिनेइंडस्ट्री ठप्प पडली होती. मात्र अनलॉक होताच हळूहळू सिनेसृष्टी स्थिरस्थावर होताना दिसते आहे. आता मालिका आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. या काळात चित्रपटाच्या शूटिंगसाठी काही निर्मात्यांनी परदेशाचा मार्ग अवलंबल्याचे पहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी छूमंतर या मराठी चित्रपटाचे लंडनमध्ये शूटिंग पार पडले. त्यानंतर आता आणखीन एका मराठी सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये होत आहे. ही माहिती या चित्रपटातील कलाकारांनीच दिली. सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता हेमंत ढोमे लंडनमध्ये एका मराठी चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर करत सांगितले की, कोव्हिडच्या लॉकडाउननंतर पहिलाच चित्रपट शूट करते आहे. माझी तर २०२०मधील पहिली फिल्म आहे आणि वर्ष संपण्याआधी ही संधी मिळाली. लोकेश विजय गुप्ते या एका अत्यंत हुशार नटाच्या दिग्दर्शनाखाली..माझा आवडता सहकलाकार हेमंत ढोमे. पुन्हा एक नवी सुरूवात.शुभारंभ 

सोनाली कुलकर्णी आणि हेमंत ढोमेच्या या चित्रपटाच्या शीर्षक आणि कथानकाबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. सोनाली व हेमंतने या चित्रपटापूर्वी पोश्टर गर्ल या चित्रपटात एकत्र काम केले आहे.


सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती धुरळा या सिनेमात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अमेय वाघ, अंकुश चौधरी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट राजकारणावर आधारीत असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या सोनाली डान्सिंग क्वीन या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे.


तर हेमंत ढोमेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो शेवटचा चोरीचा मामला या चित्रपटात पहायला मिळाला. यात त्याच्यासोबत अमृता खानविलकर, क्षिती जोग, जितेंद्र जोशी,अनिकेत विश्वासराव हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. सध्या तो चंद्र आहे साक्षीला या मालिकेत काम करताना दिसतो आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonali Kulkarni is shooting with this actor in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.