Sonali kulkarni shared a stunning selfie | सोनाली कुलकर्णी शेअर केला स्टनिंग सेल्फी, सेलिब्रेटींसह चाहतेही झाले फिदा

सोनाली कुलकर्णी शेअर केला स्टनिंग सेल्फी, सेलिब्रेटींसह चाहतेही झाले फिदा

अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोनाली कुलकर्णी ‘डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुललार्ज’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून आहे. याच शोमध्ये सोनालीने मराठी कार्यक्रमांममध्ये हिंदी गाण्यांवर नृत्य न करण्याचा तिचा निर्णय जगजाहिर केला.

सोनाली कुलकर्णी तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते. यावेळी मात्र सोनालीने साडीतले फोटोशूट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. सोनालीने वनपीसमधला सेल्फी शेअर केलं आहे. या फोटोत ती खूपच स्टनिंग दिसते आहे.. सेलिब्रेटींसह सोनालीचे चाहत्यांनी या फोटोशूटवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत तिने पदार्पण केले होते. लवकरच ती थ्री चिअर्स टू'सिनेमामध्ये हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकरसोबत दिसणार आहे . लोकेश विजय गुप्ते या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonali kulkarni shared a stunning selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.