पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती म्हणत सोनाली कुलकर्णींने शेअर केलं मराठमोळ्या अंदाजातील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 01:46 PM2021-02-23T13:46:03+5:302021-02-23T14:00:11+5:30

'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत तिने पदार्पण केले होते.

Sonali Kulkarni shared a beautiful photo shoot in a saree | पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती म्हणत सोनाली कुलकर्णींने शेअर केलं मराठमोळ्या अंदाजातील फोटो

पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती म्हणत सोनाली कुलकर्णींने शेअर केलं मराठमोळ्या अंदाजातील फोटो

googlenewsNext

अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोनाली कुलकर्णी ‘डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुललार्ज’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून आहे. याच शोमध्ये सोनालीने मराठी कार्यक्रमांममध्ये हिंदी गाण्यांवर नृत्य न करण्याचा तिचा निर्णय जगजाहिर केला.


सोनाली कुलकर्णी तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते. यावेळी मात्र सोनालीने साडीतले फोटोशूट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. सोनालीने  व्हाईट आणि रेड कलरच्या साडीतले फोटोशूट केलं आहे. पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती असं कॅप्शन देत हे फोटोशूट शेअर केलं आहे. फोटोतील सोनालीचे अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. सोनालीचे चाहत्यांनी या फोटोशूटवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत तिने पदार्पण केले होते. लवकरच ती थ्री चिअर्स टू'सिनेमामध्ये हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकरसोबत दिसणार आहे . लोकेश विजय गुप्ते या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

 

Web Title: Sonali Kulkarni shared a beautiful photo shoot in a saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.