सोनाली कुलकर्णीचे साडीतले फोटो तुम्हाला ही पाडतील तिच्या प्रेमात, see pics

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 07:15 AM2019-10-12T07:15:00+5:302019-10-12T07:15:00+5:30

सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. दिल चाहता है हा चित्रपट सोनालीच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला.

Sonali kulkarni share her saree pics on instagram | सोनाली कुलकर्णीचे साडीतले फोटो तुम्हाला ही पाडतील तिच्या प्रेमात, see pics

सोनाली कुलकर्णीचे साडीतले फोटो तुम्हाला ही पाडतील तिच्या प्रेमात, see pics

googlenewsNext

सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. दिल चाहता है हा चित्रपट सोनालीच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.


सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.


सोनालीने तिचा निळ्या रंगातील साडीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोतील तिचा सिंपल लूक चाहत्यांच्या चांगला पसंतीस उतरला आहे. सोनालीच्या या फोटोवर फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्स भरपूर मिळाल्या आहेत.

निळ्या रंगाच्या साडीत सोनालीचे सौंदर्य आणखीनच खुलून आल्याचे दिसून येत आहे. सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते. 


सोनाली लवकरच  'पेंशन' सिनेमात दिसणार आहे. मराठी चित्रपट 'पेंशन' चे कथा-लेखन आणि दिग्दर्शन मराठी सिनेमाचे पुरस्कार विजेते पुंडलिक धूमिल यांनी केले आहे.या चित्रपटामध्ये त्यांनी एका महिलेची कथा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ही महिला कशा प्रकारे फक्त पेंशनवर आपल्या लहान मुलांना कठीण परिस्थितीत वाढवते हे बघायला खूपच मजेदार असेल. या महिलेच्या भूमिकेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसणार आहे.

Web Title: Sonali kulkarni share her saree pics on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.