सोनाली कुलकर्णी आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे अस्तित्वच निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोनाली तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.  यावेळी सोनालीने तिचा नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत सूर्याची किरण सोनालीच्या चेहऱ्यावर आलेली दिसतायेत. जीवनाचे सर्व सौंदर्य प्रकाश आणि सावल्यांनी बनलेले आहे!, असे कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे.  ​सोनालीच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनी देखील कमेंट केल्या आहे. क्रांती रेडकरने लिहिले छान तर प्रार्थना बेहरेने इमोजी पोस्ट केले आहेत. 


सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब सोनालीकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.

लवकरच तिचा झिम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीये.. तर 'छत्रपती ताराराणी' आणि फ्रेश लाईम सोडा हे दोन सिनेमे सुद्धा सोनालीनं साईन केलेत.. ज्याचा फर्स्ट लूक तिनं इंस्टाग्रामवर शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिलीये.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonali kulkarni looks just as beautiful without makeup, photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.