एस.एस.राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली: द बिगनिंग' आणि 'बाहुबली: द कन्क्लुजन' या दोन सिनेमांमुळे प्रभासने लोकप्रियतेचे शिखर गाठलं आहे. आता या चित्रपटावर आधारीत वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये काही मराठी कलाकार मंडळी पहायला मिळणार आहेत. या कलाकारांपैकी एक नाव नुकतंच समोर आलंय. या वेबसीरिजमध्ये सोनाली खरे दिसणार आहे. या सीरिजमध्ये काम करण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. यात ती पारंपारिक वेशात दिसणार आहे. 


बाहुबली सीरिजबद्दल सोनाली खरेने सांगितले की, आता माझ्या भूमिकेबद्दल सांगणं उचित ठरणार नाही. या सीरिजमध्ये मी भारतीय स्त्रीच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. अशी भूमिका साकारायला मिळाल्यामुळे मी खूप खूश आहे. अशा प्रकारचा लूक असलेली भूमिका मला बऱ्याच वर्षानं करण्याची संधी मिळाली आहे. 


'बाहुबली' सीरिजच्या चमूनं माझ्यात ही भूमिका पाहिली याचा आनंद आहे. फक्त ग्लॅमरसच नव्हे, तर वेगळ्या भूमिकांमध्येही मी चांगलं काम करू शकते. मराठी चित्रपटांमध्येही मला अशा पद्धतीच्या भूमिका साकारायला आवडतील, असं सोनालीनं सांगितलं.


बाहुबलीची सुरुवात आणि त्यानंतर काय होतं हे दुसऱ्या भागात पाहायला मिळालं. मात्र, या सीरिजमध्ये या सगळ्याच्या आधी काय घडलं आहे हे दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी हैदराबादला मोठा सेट उभारण्यात आला आहे.

राजमौलीच या सीरिजचं दिग्दर्शन करताहेत. पहिल्या सीझनच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात झाली आहे. ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे.

 बाहुबलीचे चाहते ही सीरिज पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.


Web Title: Sonali Khare's entry in 'Bahubali' series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.