Sonalee Kulkarni's Stunning Look Caught Everyone's attention In this Western Look | सोनाली कुलकर्णीचा हा फोटो पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल ‘क्रेझी किया रे’!

सोनाली कुलकर्णीचा हा फोटो पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल ‘क्रेझी किया रे’!

अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.  विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे. सिनेमात अभिनय, नृत्याने रसिकांना घायाळ करणारी सोनाली कुलकर्णी रिअल लाइफमध्ये स्टायलिश आहे. तिच्या स्टाइलचा तरुणींवर प्रभाव दिसून येतो.  


सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. नुकतेच सोनालीने  एक स्वतःचा हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळत आहे. 


तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. 'ती पाहता हसीन बाला, कलेजा खलास झाला या ओळी ही आपुसकच तोंडावर येतील असा हा सोनालीचा लूक सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. नेहमी प्रमाणे सोनालीच्या चाहत्यांनी या फोटोंवर आपल्या कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. त्यामुळे सध्या सोनाली सोशल मीडियावर आपल्या स्टाइलचा जलवा दाखवत सा-यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonalee Kulkarni's Stunning Look Caught Everyone's attention In this Western Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.