सौरभ वर्मा दिग्दर्शित विक्की वेलिंगकर सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.“वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!”, अशा आशयाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 


 
‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची हे कथा आहे,” असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी सांगितले. त्यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते.  

सोनालीने  अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. सोनालीचा ‘विक्की वेलिंगकर’ सिनेमा येत्या ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

English summary :
Vicky Velingkar Movie : Actress Sonalee Kulkarni will be seen in the movie Vicky Velingkar which is directed by Saurabh Verma. Vicky Wellingkar is a comic book character who is a watch dealer.


Web Title: Sonalee kulkarni will see marathi movie vicky velingkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.