मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी 'अप्सरा' म्हणजेच सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमात सोनालीनं भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. सोनालीने नुकताच ब्लॅक अँड व्हाईट लूकमधला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोनालीच्या फॅन्सनासुद्धा तिचा हा अंदाज चांगलाच भावला आहे. तिच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलायं.


सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.


सोनालीच्या करिअरबाबत बोलायचे झाले तर तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.

Web Title: Sonalee kulkarni share her black with white dress photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.