Sonalee Kulkarni Secretly married? | अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीने केले सीक्रेट मॅरेज ?

अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीने केले सीक्रेट मॅरेज ?

मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. सोनाली सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. सोनाली  देखील लवकरच लग्नाच्या बेडीत अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात करणार आहे. कुणाल बेनोडेकरसह रिलेशनशीपमध्ये असल्याचे खुद्द सोनालीनेच कबुली दिली आहे.


रिपोर्टनुसार, कुणाल हा मूळचा लंडनचा आहे. कुणाल हा चार्टर्ड अकाउंटंट असून दुबईत सिनीयर एडजस्टर म्हणून काम करतो.सोनाली कुलकर्णी लवकरच कुणालसोबत लग्नबेडीत अडकणार असल्याचे बोलले जात असताना तिच्या एका फोटोने मात्र तिच्या चाहत्यांना चांगलेच संभ्रमात टाकले आहे. सोनालीने उलटे मंगळसूत्र घातल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिने गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तिचे हे फोटो पाहून तिचे चाहते तिला अनेक प्रश्न विचारत पडलेला पेच सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच एका चाहतीने ‘तुमचं मंगळसूत्र उलटं झालं आहे’, अशी कमेंट केली आहे. यावर सोनालीने म्हटले आहे की, ‘लग्नानंतर काही दिवस उलटंच मंगळसूत्र घालतात’  त्यामुळे सोनालीचं लग्न झालं का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. यावर सोनालीने अजूनतही काही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे तिच्या लग्नाचा पेच सुटता सुटेना अशीच काहीशी अवस्था सध्या नेटक-यांची झाली आहे.


तुर्तास साजश्रृंगार केलेल्या सोनालीचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. साडीमध्ये सोनाली कुलकर्णीचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. लाडक्या सोनाली कुलकर्णीने जेव्हापासून ती रिलेशिपमध्ये असल्याचे जाहिर केले आहे. तेव्हापासून  रसिकांचा विशेषतः तरुणांचा हिरमोड असणार हे मात्र नक्की. 

Web Title: Sonalee Kulkarni Secretly married?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.