Sonalee Kulkarni New Marathi Movie Vicky Velingkar Are Set TO Release In 6 th December 2019 | लवकरच या सिनेमातून सोनाली कुलकर्णी रसिकांच्या भेटीला, पोस्टर आले समोर

लवकरच या सिनेमातून सोनाली कुलकर्णी रसिकांच्या भेटीला, पोस्टर आले समोर


सोनाली कुलकर्णी.विविध सिनेमात सोनालीनं भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. 'नटरंग', 'अजिंठा', 'झपाटलेला-२', 'क्लासमेट', 'मितवा', 'हंपी' आणि असेच अनेक गाजलेले मराठी चित्रपट तिच्या नावावर आहेत. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. मुळात  'नटरंग' या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. 


तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे, ती चित्रीकरणातून वेळ काढून कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते. त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. सध्या लवकरच तिचा एक नवीन सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. “वेळेचे पाऊल आणि ‘वविक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!”, अशा आशयाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आणि त्याद्वारे या चित्रपटाबद्दलची रसिकांची उत्कंठा ताणली गेली आहे. या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत सोनाली झळकणार आहे. 


विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची हे कथा आहे,” असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. त्यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.  ‘विक्की वेलिंगकर’ संपूर्ण महाराष्ट्र ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sonalee Kulkarni New Marathi Movie Vicky Velingkar Are Set TO Release In 6 th December 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.