आपल्या जोडीदारापाठेपाठ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या पती-पत्नीच्या अनेक जोड्या हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत पाहायला मिळतात. आता ह्या जोड्यांमध्ये सावनी रविंद्र आणि तिच्या पतीचेही नाव सामिल झाले आहे. सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्रच्या नव-याचे डॉ. आशिष धांडेचे निर्माता म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झाले आहे.

सावनी रविंद्रचे यंदाच्या स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम् – एक निश्चय’ हे गाणे रिलीज झाले. ह्या गाण्याची निर्मिती सावनीच्या पतीने केली आहे. डॉ. आशिष धांडेच्या पदार्पणाविषयी सावनी सांगते, “यंदाचा व्हॅलेंटाईन डे आमचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन-डे होता.

त्यावेळी आशिषने माझ्या नवीन गाण्याची  निर्मिती करायची इच्छा व्यक्त केली होती. आणि आपलं पहिलं काम हे काहीतरी देशाभिमानाविषयीचं असावं, अशी त्याची इच्छा होती. त्यातूनच ‘वंदे मातरम- एक निश्चय’ ह्या गाण्याची निर्मिती करायचं ठरलं.”

 
सावनी ह्या गाण्याविषयी सांगते, “मी यंदा सावनी ओरिजनल्सची सीरिज सुरू केल्यावर तमिळ गाणं रिलीज केलं. त्याला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की, मग दूसरं गाणं हिंदी करायचं ठरलं. आजवर मी इतरांनी गायलेली देशभक्तिपर गीतं कार्यक्रमांमधून गायले होते. पण माझं स्वत:च एक गाणं असावं ही इच्छा होती. म्हणून मग ‘वंदे मातरम- एक निश्चय’ गाणं आकाराला आलं.''


Web Title: Singer savani ravindra's husband producer marathi music album
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.