मराठमोळी गायिका कार्तिकी गायकवाडचे झाले शुभ मंगल सावधान, आर्या आंबेकरने शेअर केले लग्नातील सुंदर फोटो

By गीतांजली | Updated: December 10, 2020 15:20 IST2020-12-10T15:07:37+5:302020-12-10T15:20:42+5:30

'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाड हिचा नुकताच विवाह सोहळा पार पडला आहे.

Singer kartiki gaikwad tie a knot with ronit pise | मराठमोळी गायिका कार्तिकी गायकवाडचे झाले शुभ मंगल सावधान, आर्या आंबेकरने शेअर केले लग्नातील सुंदर फोटो

मराठमोळी गायिका कार्तिकी गायकवाडचे झाले शुभ मंगल सावधान, आर्या आंबेकरने शेअर केले लग्नातील सुंदर फोटो

सध्या लग्नचा सीझन सुरू झाला आहे आणि आता सेलिब्रेटीही यात काही मागे नाहीत. आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींपासून ते मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. आता या यादीत आणखी एक नाव सामील झाले आहे. 'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाड हिचे.  जुलै महिन्यात कार्तिकाच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता कार्तिकच्या लग्नातील फोटो समोर आले आहेत. कुटुंबिय आणि मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित पुण्यात कार्तिकाचा रोनित पिसेसोबत विवाह सोहळा पार पडला. लग्नाचे काही फोटो कार्तिकीची मैत्रिण आर्या आंबेकर हिने इन्स्टास्टोरीवर शेअर केले आहेत. 


 रोनितचे कुटुंब हे कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांच्या मित्रपरिवारातील आहे.  कार्तिका पती रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे  रोनित पिसे पुण्याचा राहणारा आहे.रोनित पिसे मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. 

 आपल्या गायिकेच्या जोरावर कार्तिकीने संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  घागर घेऊन’, ‘नवरी नटली’ यांसारख्या खर्ड्या आवाजातील गाण्यांनी रसिकांना वेड लावणारी कार्तिकी अनेकांच्या लक्षात आहे.'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स'स्पर्धची गायिका कार्तिकी विजेती ठरली होती.
 

Web Title: Singer kartiki gaikwad tie a knot with ronit pise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.