सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे नवीन जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार, 'जून' सिनेमा या तारखेला रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 01:24 PM2021-06-23T13:24:01+5:302021-06-23T13:29:02+5:30

नेहा पेंडसे , सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी केले आहे.

sidharth Menon, Neha Pendse Starrer June Marathi Movie Releasing On 30th June 2021 | सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे नवीन जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार, 'जून' सिनेमा या तारखेला रसिकांच्या भेटीला

सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे नवीन जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार, 'जून' सिनेमा या तारखेला रसिकांच्या भेटीला

Next

काही दिवसांपूर्वी जितेंद्र जोशी, सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे - बायस यांच्यासह 'जून'च्या टीमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं, की अनेक महिन्यांपासून 'जून इन जून' च्या चर्चा रंगल्या होत्या. आता तर जून महिनाही संपत आला. कधी येणार आहे हा 'जून' प्रेक्षकांच्या भेटीला? आमची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 

आता तरी 'जून' प्रदर्शित करा. प्रेक्षकांसोबतच आता कलाकारही 'जून'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आपल्या या मित्रमंडळींचा आणि प्रेक्षकांचा मान राखत अखेर 'जून' चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  त्यामुळे अनेक दिवसांची ही प्रतीक्षा आता संपली असून चित्रपटप्रेमी लवकरच 'जून' प्लॅनेट मराठी सिनेमावर पाहू शकणार आहेत. 

'हिलिंग इज ब्युटीफुल' अशी टॅगलाईन असलेल्या 'जून' या चित्रपटाच्या ट्रेलरवरून साधारण अंदाज आला असेलच. नेहा पेंडसे - बायस आणि सिद्धार्थ मेनन यांचं  मैत्री पलीकडचं नातं यात पाहायला मिळणार आहे. नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी केले आहे. तर जितेंद्र जोशी, निखिल महाजन यांचे शब्द लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांना शाल्मलीने संगीतबद्ध केले आहे. संवेदनशील कथानक लाभलेल्या 'जून'ने अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. नुकताच 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये सिद्धार्थ मेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जाहीर झाला आहे. 

अभिनेत्री नेहा पेंडसेने 'जून' विषयी सांगते, ''जून हा नक्कीच पठडीबाहेरील चित्रपट आहे. मला खूप आनंद होतोय, की 'जून'च्या निमित्ताने सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. निखिल महाजन याने त्याच्या भावना लिहून एक उत्तम काम केले असून त्याच्या भावनांना सुहृद आणि वैभवने जिवंत केले आहे. हा एक धाडसी विषय असला तरी भावनिक आहे, त्यामुळे दुःखावर हळुवार फुंकर मारत हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल. प्लॅनेट मराठी खऱ्या अर्थाने या चित्रपटाला जागतिक स्थरावर प्रदर्शित करून योग्य न्याय देत आहे. यापेक्षा चांगले व्यासपीठ आम्हाला मिळूच शकले नसते.''

'जून'च्या प्रदर्शनाबद्दल सिद्धार्थ मेनन म्हणतो, '' एक कलाकार म्हणून हा चित्रपट आम्हा सर्वांसाठीच एक टर्निंग पॉईंट आहे. एक कलाकार म्ह्णून अधिक बारकाईने मला 'नील'च्या भूमिकेकडे बघता आले. प्रत्येकाच्या आयुष्याशी कुठेतरी साध्यर्म असलेला हा विषय प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारा आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया येतात, आता याकडे आमची उत्सुकता लागली आहे. तसेच 'प्लॅनेट मराठी' ओटीटीच्या जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 'जून'चा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे, ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे.''

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sidharth Menon, Neha Pendse Starrer June Marathi Movie Releasing On 30th June 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app