मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची भावी पत्नी म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर हिचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्ताने सिद्धार्थने तिचा फोटो शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

सिद्धार्थ चांदेकरनेमिताली मयेकरचा फोटो शेअर करत लिहिले की, भाग्य आणि नशीब वगैरे वर माझा विश्वास नाही आहे. मला कायम वाटतं की आपण काही वाईट केलं की आपल्याला वाईट मिळतं आणि आपण काही चांगलं केलं की आपल्याला खूप चांगलं मिळतं. मी खरंच काहीतरी फार चांगलं केलं असेन आयुष्यात म्हणून तुला भेटायला मिळालं आणि जाणून घ्यायला मिळालं. आणि जर का ह्याला नशीब म्हणतात...तर मी बेहद्द खूष आहे माझ्या नशिबावर. 
हॅप्पी बर्थडे लव.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकरचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा पार पडला. साखरपुडा पार पडण्यापूर्वी ते दोघे त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते. आताही ते दोघे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 


मितालीने मालिका व चित्रपटात काम केलं आहे. तर सिद्धार्थ हिरकणी चित्रपटात झळकणार आहे.

तो पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे.

या चित्रपटातून ९ कलाकार ६ लोककलांमधून छत्रपती शिवरायांना देणार मानाचा मुजरा देणार आहेत.


Web Title: Siddhartha Chandekar writes happy birthday to his future wife
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.