siddharth jadhav and genelia d'souza cute discussion on twitter | असे काय घडले की, सिद्धार्थ जाधववर आली जेनेलिया डिसोझा देशमुखसोबत हात जोडण्याची वेळ
असे काय घडले की, सिद्धार्थ जाधववर आली जेनेलिया डिसोझा देशमुखसोबत हात जोडण्याची वेळ

ठळक मुद्देतुम्ही रिअल लाईफमध्ये देखील रिव्हर्स किंग आहात... जमलंय बघा... जेनेलियाचे हे ट्वीट वाचल्यानंतर सिद्धार्थला बहुधा आता काय बोलायचे हेच सुचत नव्हते आणि त्यामुळे त्याने हात जोडत केवळ वहिनीसाहेब असे लिहिले.

रितेश देशमुखचा माऊली हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. रितेशच्या अभिनयाचे तर चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत सिद्धार्थ जाधवची महत्त्वाची भूमिका होती. या दोघांचाही अभिनय प्रेक्षकांना आवडला होता. या चित्रपटाच्या काही महिने आधी आपल्याला फास्टर फेणे हा चित्रपट पाहायला मिळाला होता. या चित्रपटातील अंबादास या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. रिव्हर्स रिक्षा चालवण्यात तरबेज असलेल्या अंबादासची भूमिका सिद्धार्थ जाधवने साकारली होती. या चित्रपटातील अंबादास प्रमाणेच सिद्धार्थ खऱ्या आयुष्यात देखील रिव्हर्स किंग आहे असे दुसरे कोणाचे नाही तर अभिनेत्री जेनेलिया डिसोझा देशमुखचे म्हणणे आहे.

जेनेलिया आणि सिद्धार्थ यांच्यात नुकताच ट्वीटरवर एक मजेशीर संवाद घडला. या संवादाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या संवादाची सुरुवात रितेश देशमुखच्या एका ट्वीटवरून झाली. रितेशने त्याच्या ट्वीटरवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत आपल्याला पाठमोरा रितेश दिसत असून त्याच्या दोन्ही मुलांनी त्याचा हात पकडला आहे. या फोटोसोबत रितेशने लिहिले होते की, जेव्हा आपण फोटोसाठी पोझ देत नाही... तेव्हाच चांगला फोटो येतो. हा फोटो कोणी काढला हे देखील त्याने लिहिले होते. त्याने लिहिले होते की, इन हाऊस फोटोग्राफर... जेनेलिया... 

रितेशचा हा फोटो त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडला होता. हा फोटो पाहून सिद्धार्थ जाधवने लगेचच या फोटोवर कमेंट केली. त्याने लिहिले की, सर सुपर...


सिद्धार्थने हे कमेंट करताच जेनेलियाने लगेचच सिद्धार्थची टर खेचायला सुरुवात केली. तिने लिहिले की, सर सुपर? आणि जिने फोटो काढलाय तिच्याबद्दल काही नाही... 

जेनेलियाच्या या ट्वीटवर काय बोलायचे हा सिद्धार्थला नक्कीच प्रश्न पडला असेल पण त्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि लिहिले की, सर सुपर वुमन आहात जेनेलिया मॅम... खूप चांगला फोटो काढला आहात तुम्ही असे लिहायचे होते. पण टायपिंग मिस्टेक झाली. खूपच छान क्लिक... 

सिद्धार्थने हे ट्वीट केल्यानंतर लगेचच जेनेलियाने सिद्धार्थला उत्तर दिले की, तुम्ही रिअल लाईफमध्ये देखील रिव्हर्स किंग आहात... जमलंय बघा...


जेनेलियाचे हे ट्वीट वाचल्यानंतर सिद्धार्थला बहुधा आता काय बोलायचे हेच सुचत नव्हते आणि त्यामुळे त्याने हात जोडत केवळ वहिनीसाहेब असे लिहिले. 


Web Title: siddharth jadhav and genelia d'souza cute discussion on twitter
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.