सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. त्यामुळेच मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णीनंतर, मानसी नाईक आणि आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्याही लग्नाचे सूर ऐकायला मिळत आहेत.

 

 सध्या सिद्धार्थ आणि मिताली दोघांच्याही घरी लगीन घाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच सिद्धार्थच्या घरी ग्रहमख पूजा करण्यात आली. या पूजेपासून लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.सिद्धार्थ चांदेकरने गृहमुख पुजेचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केली आहेत. 

मराठी इंडस्ट्रीतील कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर दोघे कधी लग्नबंधनात अडकणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर तो क्षण आला आणि आता हे कपल त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 


या दोघांचं लग्न पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या एका जुन्या वाड्यामध्ये होणार आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं होतं.

गेल्याच वर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच दोघांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत.सोशल मीडियावर दोघेही एक्टीव्ह असतात.

 

लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते चाहत्यांसह शेअर करत असतात. तसेच त्यांचे रोमँटीक फोटो शेअर करत कपल गोलही देताना दिसायचे. चाहत्यांनाही त्यांचे केमिस्ट्री खूप पसंत येते. त्यामुळे त्यांच्या फोटोंना चाहतेही खूप सारे लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Siddharth Chandekar Wedding Rituals Starts Shares Grahmag Pooja Vidhi Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.