छोटा पडदा, मोठा पडदा आणि वेबसिरीजमधून रसिकांच्या मनात सिद्धार्थने घर केले आहे. सिद्धार्थ सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असतो. नुकताच सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांने हिरव्या रंगाच्या कुर्तावर गॉगल लावले आहे. सिद्धार्थ या फोटो खूपच हँडसम हंक दिसतोय. या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरू आहे. सिद्धार्थने अग्निहोत्र या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच मालिकेतील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.


त्यानंतर त्याने 'झेंडा', 'बालगंधर्व', 'सतरंगी रे', 'क्लासमेट्स', 'वजनदार',  गुलाबजाम यांसारख्या चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरील त्याच्या 'जिवलगा' या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच त्याची 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेबसिरीजही रसिकांना भावली. 


गेल्या वर्षी सिद्धार्थने अभिनेत्री मिताली मयेकरसोबत साखरपुडा केला आहे. सिद्धार्थ आणि मिताली लवकरच एका ऑस्ट्रेलियन चित्रपटात झळकणार आहेत. हे दोघंही चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. सिद्धार्थने याबाबत सांगितले होते की, 'हा चित्रपट म्हणजे एक कौटुंबिक ड्रामा आहे. एक रोड ट्रीप हा विषय यात हाताळला गेला आहे. आलोक राव हा चित्रपट दिग्दर्शित करतोय.

Web Title: Siddharth chandekar looking handsome in his new photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.