ठळक मुद्देसिद्धार्थने इन्स्टाग्रामला हे फोटो शेअर करून केवळ तीन तास झाले असले तरी या फोटोंना 26 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. ते दोघे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये खूपच छान दिसत असून त्यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना भावत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची होणारी भावी पत्नी म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघं सातत्याने सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असतात. या दोघांचा यावर्षी जानेवारी महिन्यात साखरपुडा झाला. त्याआधीपासून ते दोघे सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटो शेअर करत असतात. त्या दोघांनी आता एक रोमँटिक फोटोशूट केले असून त्यांचे हे अंडरवॉटर फोटोशूट त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

सिद्धार्थ आणि मिताली यांच्या या बोल्ड आणि हॉट फोटोंना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत असून हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. सिद्धार्थने इन्स्टाग्रामला हे फोटो शेअर करून केवळ तीन तास झाले असले तरी या फोटोंना 26 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. ते दोघे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये खूपच छान दिसत असून त्यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना भावत आहे. फॅशन फोटोग्राफर गौतम हिंगेने हे फोटो काढले असून या फोटोवर त्या दोघांच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सिद्धार्थ आणि मिताली लवकरच एका ऑस्ट्रेलियन चित्रपटात झळकणार आहेत. हे दोघंही चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नुकतेच ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. एक महिनाभर ते तिथे राहणार आहेत. सिद्धार्थने याबाबत सांगितलं, की ‘हा चित्रपट म्हणजे एक कौटुंबिक ड्रामा आहे. एक रोड ट्रीप हा विषय यात हाताळला गेला आहे. आलोक राव हा चित्रपट दिग्दर्शित करतोय.

‘उर्फी’ चित्रपटातून मितालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं. तर ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ यांसारखे अनेक चित्रपट ‘अग्निहोत्र’, ‘प्रेम हे’ यांसारख्या मालिकेतून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

गेल्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं होतं. आता मिताली आणि सिद्धार्थ लग्नबेडीत कधी अडकणार हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Siddharth Chandekar and mitali mayekar romantic picture got viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.