अभिनेत्री श्रृती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.


श्रृतीने गाऊन तिचा ट्रेडिशनल लूकमधला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोतील तिचा सिंपल लूक तिच्या सौंदर्याला चार चांद लावतो आहे. गुलाबी रंगात श्रृतीचे सौंदर्या आणखी खुलून आलं आहे. तिच्या फोटोवर फॅन्सनी  लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे. 


मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रृतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रृतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

श्रृतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रृतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रृती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रृतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे.

Web Title: Shruti marathe looking gorgeous in traditional dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.