कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे सर्व काही ठप्प झाले. त्यामुळे शूटिंगही बंद आहेत. सर्व सेलिब्रेटी घरात आहेत आणि त्यांच्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करत आहे. अभिनेत्री श्रिया पिळगावकरदेखील लॉकडाउनमुळे घरातच आहेत. ती सोशल मीडियावरून तिचे अपडेट व चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतेच तिने घरातच फोटोशूट केले आहे आणि तिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

श्रियाने घरात केलेल्या फोटोशूटमध्ये व्हाईट रंगाचा शॉर्ट वनपीस परिधान केला आहे. या तिच्या फोटोंना खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. 

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या 'मिर्झापूर' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

तसेच तिची हाऊस अरेस्ट ही वेबसीरिज रिलीज झाली आहे. तसेच तिचा भांगडा पा ले हा चित्रपट रिलीज झाला आहे. आता ती लवकरच हाथी मेरे साथी चित्रपटात झळकणार आहे. 


'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्कीच्या जागी श्रियाची वर्णी लागली आहे. या चित्रपटातून ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.


श्रिया पिळगावकरने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, २०१९ वर्षाची सुरूवात खूप चांगली झाली असून मी हाथी मेरे साथी चित्रपटात राणा दुग्गाबतीसोबत दिसणार आहे. या चित्रपटात काम करायला मजा येणार आहे आणि या चित्रपटाचा विषय खूप चांगला आहे. माझ्यासाठी हा चित्रपट खूप खास असून पहिल्यांदाच मी त्रिभाषिक चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटातून तमीळ व तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे.


श्रिया पिळगावकरने शाहरूख खानसोबत 'फॅन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.अनुभव सिन्हाचा आगामी चित्रपट 'अभी तो पार्टी शुरू हुई है' आणि गुरींदर चड्ढाचा ब्रिटीश पीरिएड ड्रामा 'बीचम हाऊस'मध्ये श्रिया पाहायला मिळणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shriya Pilgaonkar did a photoshoot at home in Lockdown TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.