छोट्या पडद्यावरील कॉमेडी रिएलिटी शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं.

श्रेयाचा जन्म हा पुण्यात एका मराठी कुटुंबात झाला असला तरी ती एका गुजराती कुटुंबाची सून आहे.27 डिसेंबर 2015 रोजी श्रेया आणि निखील सेठ यांचा विवाह संपन्न झाला.श्रेया आणि निखील यांचे लव्ह मॅरेज आहे.एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान या दोघांची भेट झाली.


या मालिकेच्या सेटवर निखील श्रेयाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत असे. मात्र काही तरी दोघांमध्ये बिनसलं आणि वाद झाला. त्यामुळे दोघं एकमेकांपासून दूर गेले होते. 


मात्र त्यांच्यातला हा दुरावा काही फार काळ राहिला नाही. कारण एका गाजलेल्या मराठी मालिकेचा कार्यकारी निर्माता अशी निखीलच्या नावाची क्रेडिट लाईन श्रेयाने पाहिली आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. यानंतर दोघांमध्ये पुन्हा एकदा संवाद सुरु झाला.त्याच काळात निखीलच्या घरी त्याच्या लग्नाची तयारी सुरु होती.त्यामुळे निखीलने श्रेयाला तू सिंगल आहेस का अशी विचारणा केली. 


त्यावर श्रेयाने हो असं उत्तर देताच निखीलने फार वेळ न दवडता तिला प्रपोज केले. श्रेयानेही त्याला हो असं उत्तर दिलं.यानंतर कुटुंबीयांच्या सहमतीने दोघांचं लग्न जुळलं. निखीलसाठी हे लव्ह ऍट फर्स्ट साईट होते. मात्र श्रेयासाठी तसं नव्हते.मात्र आज दोघांचा सुखी संसार सुरु असून दोघं एकमेंकांसह खुश आहेत. 

Web Title: Shreya bugde and nikhil sheth untold love story gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.