Shocking...! मराठी अभिनेत्री श्रुती मराठेला करावा लागला होता कास्टिंग काऊचचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 07:00 AM2020-06-17T07:00:00+5:302020-06-17T07:00:00+5:30

श्रुती मराठेने सांगितले होते की, एका निर्मात्याने चित्रपटासाठी माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती. 

Shocking ...! Marathi actress Shruti Marathe had to face the casting couch | Shocking...! मराठी अभिनेत्री श्रुती मराठेला करावा लागला होता कास्टिंग काऊचचा सामना

Shocking...! मराठी अभिनेत्री श्रुती मराठेला करावा लागला होता कास्टिंग काऊचचा सामना

Next

सिनेइंडस्ट्रीत करियर करण्याची इच्छा असणाऱ्या काही नवोदीत अभिनेत्रींना बऱ्याचदा वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रुती मराठेने कास्टिंग काऊचचा किस्सा शेअर केला होता. त्यात तिने एका निर्मात्याने तिला वन नाइट स्टॅण्डसाठी विचारले होते. मात्र त्यावेळी तिने सडेतोड उत्तर देत चित्रपट नाकारला होता.

श्रुती मराठे हिने ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत तिच्या करियरमध्ये आलेल्या अनेक चांगले व वाईट अनुभव शेअर केले होते. त्या मुलाखतीत तिने सांगितले होते की, एका निर्मात्याने चित्रपटासाठी माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती. चित्रपटात काम करायचे असेल तर अशा तडजोडी कराव्या लागतात असेही तो म्हणाला होता. पण जर अभिनेत्री होण्यासाठी मला एखाद्याची शय्यासोबत करावी लागणार असेल तर हिरो होण्यासाठी तुम्ही त्याला काय करायला सांगता? असा रोखठोक सवाल मी त्या निर्मात्याला विचारला होता. माझ्या बोचऱ्या सवालाने तोही स्तब्ध झाला होता. मी त्याच्या वाईट हेतूबद्दल इतरांना सांगितले माझ्या हितचिंतकांनी मला या प्रोजक्टमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता. एका मिनिटांत घेतलेल्या त्या निर्णयाने मला धाडसी बनवले.मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रृतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रृतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

श्रृतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रृती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे.

Web Title: Shocking ...! Marathi actress Shruti Marathe had to face the casting couch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app