सेलिब्रिटी आणि कलाकारांना कामाच्या तसंच शुटिंगच्या धावपळीत निवांत क्षण फार कमी वेळा येतात. मात्र ज्यावेळी कामातून मोकळा वेळ मिळतो तेव्हा त्या वेळेचा पूर्णपणे मनमुराद आनंद घेण्याची संधी कलाकार काही सोडत नाहीत. अशाच कलाकारांमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा ऑक्टोबर महिन्यात शर्मिष्ठा राऊने तेजस देसाईसोबत  लग्नागाठ बांधली होती.लग्नानंतर लगेचच शर्मिला शूटिंगमध्ये व्यस्त झाली होती. आणि त्याचदरम्यान कोरोनामुळे प्रवास करणेही फारसे सुरक्षित नव्हते. 


त्यामुळे या कपलने हनीमूनचे कोणतेही प्लानिंग केले नव्हते. मात्र हळूहळू सगळेकाही पुर्ववत होत आहे. त्यातही कामातून निवांत वेळ मिळताच या दोघांनी हनीमून ट्रीप प्लॅन केली. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. मालदीव्हज या ठिकाणी शर्मिष्ठा आणि तेजस दोघेही एकमेकांसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. खुद्द शर्मिष्ठानेच मालदीव्हजमधील काही खास फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. 


शर्मिष्ठा आणि तिचा पती तेजस एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं जाऊ लागले आहे. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.

 

सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते. लग्न ठरल्यापासून ते लग्नापर्यंत सगळ्या गोष्टी शर्मिष्ठाने आपल्या चाहत्यांसह शेअर केल्या होत्या. 


तेजस हा 'बोस' कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर आहे. शर्मिष्ठाने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शर्मिष्ठाने सांगितले की, 'आमचे अरेंज मॅरेज असले, तरी हे 'लव्ह मॅरेज' आहे असेच मी म्हणेन. माझी बहीण सुप्रियाने आमची ओळख करुन दिली. त्याला पहिल्या भेटीतच मी आवडले होते.

 

त्याने मला लग्नाची मागणी घातली, पण मी थोडा वेळ घेतला. काही महिन्यांनी होकार दिला.'दिल तो पागल है' सिनेमासारखे फिल्मी काहीसे झाले. तुम्हाला ते आतून वाटते… हाच आपला 'मिस्टर राईट' आहे, याचा कौल अंतर्मनाने मला दिला.'

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sharmishtha Raut And Tejas Desai Enjoying Their Honeymoon In Maldives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.