The secret of Pooja Sawant's pregnancy was unraveled | ​पूजा सावंतच्या प्रेग्नन्सीचे गुपित उलगडले

​पूजा सावंतच्या प्रेग्नन्सीचे गुपित उलगडले

मराठी तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ग्लॅमरस अभिनेत्री पूजा सावंत चक्क प्रेग्नंट असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपूर्वी वाऱ्यासारखी पसरली होती. या बातमीमुळे पूजाच्या चाहत्यांना चांगलाच धक्काच बसला. सोशल नेट्वर्किंग साईटवर दिसलेल्या पूजाच्या एका फोटोमुळे या गोष्टीची चर्चा सुरू झाली. आठ महिन्याच्या बेबी बंप फोटोमुळे या चर्चेला चांगलेच उधाण आले होते.  पण आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून आगामी 'लपाछपी'या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यानचा तिचा हा नवा लुक असल्याचे समोर आले आहे. अरुणा भट आणि सुर्यवीरसिंग भुल्लर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. विशाल फुरिया लिखित आणि दिग्दर्शित 'लपाछपी' हा सिनेमा येत्या १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 
'लपाछपी' या सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यापूर्वी या सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये आपले नशीब आजमावले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण १५ पुरस्कारांवर या सिनेमाने मोहर उमटवली आहे. तसेच हडसन, ओहायो येथील इंटरनॅशनल हॉरर हॉटेलचा पुरस्कार देखील 'लपाछपी' या चित्रपटाने आपल्या नावे केला आहे. शिवाय २०१६ साली माद्रिद येथे झालेल्या माद्रिद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला पाच नामांकने मिळाली होती. ज्यात पूजाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत निवड करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गतवर्षीच्या ब्रुकलीन फिल्म फेस्टिवल्समध्ये या चित्रपटाला स्पिरीट अवार्डने सन्मानित करण्यात आले होते. तसेच लंडन येथे लवकरच होत असलेल्या लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये देखील हा सिनेमा दाखवला जाणार आहे. 
पूजा सावंत या चित्रपटात एका गरोदर महिनेच्या व्यक्तिरेखेत असल्याने तिचा हा लूक सगळीकडे व्हायरल झाला होता. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The secret of Pooja Sawant's pregnancy was unraveled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.